
एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांनी गांधी, पवार, बॅनर्जींना मागितला पाठिंबा
नवी दिल्ली : एनडीएच्या (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पाठिंबा मागितल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. (NDAs presidential candidate Draupadi Murmu asked the opposition for support)
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (presidential candidate) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी शुक्रवारी (ता. २४) संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे बडे नेते उपस्थित होते.
तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू शुक्रवारी संसद भवनात पोहोचल्या. येथे त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी चार सेटमध्ये उमेदवारी दाखल केली. द्रौपदी मुर्मूच्या नामांकनात भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी एनडीएची एकजूटही पाहायला मिळाली. उमेदवारी अर्जावेळी जेडीयू व बीजेडीचे नेते उपस्थित होते. याशिवाय जगन मोहन रेड्डी यांच्या पक्ष वायएसआर काँग्रेसचे नेतेही अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले.
हेही वाचा: नितीन देशमुखांचा गॉडफादर कोण? त्यांच्या शब्दावरून घेतला ‘यू टर्न’!
द्रौपती मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. १८ मे २०१५ ते १२ जुलै २०२१ पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. संथाल आदिवासी समुदायातून आलेल्या द्रौपदी मुर्मू साधेपणा आणि संघर्षाच्या जीवनासाठी ओळखल्या जातात.
२००९ पासून पती आणि दोन मुलांसह कुटुंबातील अनेक सदस्य गमावलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी मुलींना खडतर संघर्षात वाढवले. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू निवडणूक जिंकल्यास देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती (presidential) ठरतील. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांनी अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली.
Web Title: Ndas Presidential Candidate Draupadi Murmu Asked The Opposition For Support
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..