'एनडीटीव्ही' बंदीवरील टीका राजकीय हेतूने प्रेरित - नायडू

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

चेन्नई - एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर एक दिवसाची बंदी घालण्यावरून टीका करणाऱ्यांवर सूचना आणि प्रसारणमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी जोरदार हल्लाबोल चढविला. उशिराने होत असलेली टीका एक वाद निर्माण करण्यासाठी अपूर्ण माहिती आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट होते, असे नायडू यांनी म्हटले आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथे सुरक्षा दलाच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे थेट प्रक्षेपण करताना नियमांचा भंग केल्याप्रकरणी एनडीटीव्हीविरुद्धच्या प्रस्तावित कारवाईवरून उशिराने होत असलेली टीका स्पष्टपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सिद्ध होते, असे नायडू यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, की 3 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारचा निर्णय सार्वजनिक झाल्याच्या एक दिवसानंतर अशा प्रतिक्रिया समोर आल्या, ज्या स्पष्टपणे अकारण वाद निर्माण करण्याच्या भावनेने प्रेरित आहेत. 2005 ते 2014 या कॉंग्रेसप्रणित यूपीच्या सत्ताकाळात सरकारने 21 प्रकरणांत अनेक वृत्तवाहिन्यांवर बंदीचे आदेश दिले होते, हेसुद्धा लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. एक स्टिंग ऑपरेशन दाखविणाऱ्या वाहिनीवर 30 दिवसांची बंदी घालण्यात आली होती.

"एनडीटीव्ही'बाबतचा निर्णय हा सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे. ही काही बंदी नाही. त्यांना एका दिवसासाठी वाहिनीचे प्रक्षेपण तात्पुरते बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री

Web Title: ndtv ban criticism inspired by political motives