निर्यातीत वाढ करण्याची गरज : पंतप्रधान मोदी

पीटीआय
शनिवार, 23 जून 2018

गेल्या आर्थिक वर्षांच्या अंतिम तिमाहीत देशाचा विकासदर 7.7 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. मात्र, हे पुरेसे नाही. आता 7 ते 8 टक्के विकासदराच्या मर्यादेतून बाहेर पडत तो दहा किंवा त्यापेक्षा अधिक अंकात घेऊन जाण्याची वेळ आली आहे.

नवी दिल्ली : निर्यातवाढीवर भर देण्याची आवश्‍यकता नमूद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताला 5 हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थांच्या श्रेणीत पोचविण्यासाठी एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वार्षिक विकासदर दुहेरी अंकापर्यंत घेऊन जाणे आणि जागतिक व्यापारामधील देशाची भागीदारी दुप्पट करून 3.4 टक्के करण्याच्या लक्ष्यावर जोर दिला. 

राजधानीमध्ये वाणिज्य मंत्रालयाच्या नव्या कार्यालय परिसरातील वाणिज्य भवनच्या भूमिपूजन समारंभात बोलताना मोदी म्हणाले, आमच्या सरकारने देशात व्यापार करण्याची प्रक्रिया सहज बनविण्यासाठी चार वर्षांत अनेक पावले उचलली आहेत.

गेल्या आर्थिक वर्षांच्या अंतिम तिमाहीत देशाचा विकासदर 7.7 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. मात्र, हे पुरेसे नाही. आता 7 ते 8 टक्के विकासदराच्या मर्यादेतून बाहेर पडत तो दहा किंवा त्यापेक्षा अधिक अंकात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. यांनी त्यांच्या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना सांगितले की, देश आता कामे रोखणे, लटकविणे आणि भरकटविण्याच्या संस्कृतीपासून पुढे गेला आहे. 
 

Web Title: Need to increase exports says PM Modi