esakal | ड्रॅगनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळ्या उपग्रहांची आवश्‍यकता
sakal

बोलून बातमी शोधा

India-and-China

म्हणून हवेत उपग्रह
चीनने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशला लागून असणाऱ्या ताबा रेषेनजीक देखील वेगाने बांधकाम करायला सुरवात केला आहे. या सगळ्याच हालचालींवर लक्ष ठेवणे कठीण असते त्यामुळे देशाला आणखी उपग्रहांची आवश्‍यकता भासणार आहे. प्रत्येक ठिकाणी चीनला शह देण्यासाठी भारताला आपली आघाडी अधिक भक्कम करावी लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

ड्रॅगनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळ्या उपग्रहांची आवश्‍यकता

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - चीनच्या कुरापतींना पायबंद घालण्यासाठी केवळ लष्करी बळ पुरेसे ठरणार नाही, ड्रॅगनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी चार ते सहा वेगळ्या उपग्रहांची आवश्‍यकता असल्याचे गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून चीनने नेमक्या कोणत्या ठिकाणी,  कधी घुसखोरी केली हे स्पष्टपणे कळू शकेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनने भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याबरोबरच त्यांच्या हद्दीतील शिनजियांग प्रांतामध्ये युद्धसराव देखील केला होता. भारताला लागून असलेल्या सीमा भागामध्ये चीनने चाळीस हजार सैनिक तैनात केले असून त्यांच्याकडून अत्याधुनिक शस्त्रे आणि तोफखाना देखील मैदानात उतरविण्यात आला आहे. चीनच्या या कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने देखील ताबा रेषेवर रणगाडे तैनात केले आहेत. चीन एकाच वेळी अनेक ठिकाणांवर घुसखोरी करू शकतो त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एकापेक्षा अधिक उपग्रहांची आवश्‍यकता असल्याचे गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या अंतर्गत भागांमध्ये नेमक्या काय कारवाया सुरू आहेत यावर लक्ष ठेवण्यासाठी उच्च क्षमतेचे सेन्सर आणि कॅमेरे यांनी सज्ज  असलेल्या उपग्रहांची आवश्‍यकता असल्याचे गुप्तचरांचे म्हणणे आहे. या उपग्रहांमुळे भारताला अगदी लहान  घटकांवर देखील अधिक बारकाईने लक्ष ठेवता येईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. या देखरेखीसाठी सध्या भारतीय गुप्तचर संस्थांना बऱ्यापैकी परकी उपग्रहांवर अवलंबून राहावे लागते अशी माहिती सूत्रांनी दिली.

संख्या वाढवावी लागेल
सध्या  भारतीय लष्कर हे चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाचांच आधार घेते पण त्यांची संख्या पुरेशी नसल्याचे गुप्तचरांचे म्हणणे आहे. या उपग्रहांची संख्या वाढविल्यास स्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होऊ शकते. जगातील बडे देश हे सध्या उपग्रहांच्या माध्यमातूनच हेरगिरी करत असतात असे संरक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

हालचालीत अडथळा
सध्या चिनी सैन्य हे पँगॉंग सरोवरालगतच्या भागामध्ये ठाण मांडून बसले आहे. येथूनच माघार घेण्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिला आहे. फिंगर पाचजवळ टेहळणी चौकी उभी करण्याचा चीनचा विचार आहे. गोगरामध्येही चीनने छुप्या पद्धतीने घुसखोरी केली आहे पण भारताला काही हालचालींचा अंदाज आला नाही त्यामुळे मध्यंतरी सैन्याची वेगाने हालचाल करणे शक्य झाले नाही.

Edited By - Prashant Patil

loading image