Neeraj Chopra Wife: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची पत्नी हिमानीने घेतला धाडसी निर्णय; दीड कोटींचं पॅकेज नाकारलं अन् टेनिसलाही अलविदा, कारण आता...

Neeraj Chopra wife Himani Mor: याबाबत नीरज चोप्राची पत्नी हिमानी हिचे वडील सोनीपतचे रहिवासी चांद मोर यांनी स्वत: एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
Himani Mor, wife of Olympic gold medalist Neeraj Chopra, chose business over a ₹1.5 crore job and tennis career.
Himani Mor, wife of Olympic gold medalist Neeraj Chopra, chose business over a ₹1.5 crore job and tennis career.esakal
Updated on

Neeraj Chopra’s Wife Himani Mor Takes Bold Career Decision: भारताचा गोल्डन बॉय अर्थात ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. खरंतर ही बातमी नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर हिच्याबाबत आहे. जी ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्च वाटू शकतं. कारण, हिमानीने एक धाडसी निर्णय घेतला आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

 कारण, आता नीरज चोप्राची पत्नी  हिमानी मोर ही  टेनिस सोडून व्यवसाय सांभाळणार आहे. हिमानीने अमेरिकेच्या साउथ-ईस्टर्न लुईझियाना विद्यापीठातून स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ती व्यवसाय करणार आहे. विशेष म्हणजे यासाठी हिमानीने तब्बल दीड कोटी रुपयांचे जॉब पॅकेज देखील, यासाठी नाकारले आहे.

तर यासंदर्भात हिमानीचे वडील सोनीपतचे रहिवासी चांद मोर यांनी म्हटले आहे की,  हिमानीचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आता तिने क्रीडा संबंधित व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Himani Mor, wife of Olympic gold medalist Neeraj Chopra, chose business over a ₹1.5 crore job and tennis career.
2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

प्राप्त माहितीनुसार, हिमानी मोर हिने स्पोर्ट्स अँड फिटनेस मॅनेजमेंट आणि एचआर मॅनेजमेंटमध्ये डबल एमबीए पदवी घेतली आहे. शिवाय, तिने अमेरिकेत अर्धवेळ सहाय्यक प्रशिक्षक आणि टेनिस संघ व्यवस्थापक म्हणूनही काम केलेले आहे. जून १९९९ मध्ये जन्मलेल्या हिमानीने चौथी इयत्तेपासून टेनिस खेळायला सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com