सपला धक्का; माजी पंतप्रधानांच्या मुलाचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व बलियाचे माजी खासदार नीरज शेखर यांनी आज समजवादी पक्ष व राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत बलियाधून त्यांना तिकीट न दिल्याने ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज झाल्याचे सांगितले जाते. समाजवादी विचारसरणीत वाढलेले नीरज शेखर हे भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता असून पुढील वर्षी (2020) भाजप त्यांना राज्यसभेचे कन्फर्म तिकीटही देणार असल्याची चर्चा आहे. 
 

नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व बलियाचे माजी खासदार नीरज शेखर यांनी आज समजवादी पक्ष व राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत बलियाधून त्यांना तिकीट न दिल्याने ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज झाल्याचे सांगितले जाते. समाजवादी विचारसरणीत वाढलेले नीरज शेखर हे भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता असून पुढील वर्षी (2020) भाजप त्यांना राज्यसभेचे कन्फर्म तिकीटही देणार असल्याची चर्चा आहे. 

नीरज शेखर हे अखिलेश यांच्या निकटवर्तीयंपैकी असल्याने त्यांचा थेट राजीनामा हा अखिलेश यांनाच झटका मानला जातो. शेखर यांच्या नाराजीनाम्याबाबत ते स्वतः किंवा भाजप यांच्याकडून अद्याप प्रतीक्रिया आलेली नाही. नीरज शेखर यांनी चंद्रशेखर यांच्या निधनानंतर त्यांचा पारंपारीक मदारसंघ असलेल्या बलियामधून 2007 व 2009 मध्ये दोनदा निवडणूक लढविली व ते विजयीही झाले. 2014 मध्ये भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. नंतर अखिलेश यांनी त्यांना राज्यभेवर पाठविले होते. 2020 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातून सपाकडून पुन्हा निवडून येण्याची सुतराम शक्‍यता न दिसल्याने शेखर यांनी भाजपचा पर्याय निवडण्याचा विचार चालविल्याची माहिती आहे. 

यंदाच्या निवडणुकीत त्यांनी सपा बसपा महाआघाडी व मोदी सरकारबद्दलची कथितत नाराजी यांचा लाभ घेण्यासाठी सपाकडून पुन्हा तिकीट मागितले होते. मात्र अखिलेश यादव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व अखेरच्या क्षणी सनातन पांडे यांना बलियाचे तिकीट दिले. त्यामुळे शेखर हे सपा नेतृत्वावर प्रचंड नाराज जाल्याची चर्चा होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे ती खरी असल्याचे सिध्द झाले. त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबद्दल तूर्त कोणीही बोलण्यास तयार नसले तरी या महिनाअखेरीस नीरज शेखर यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे अडकविले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. 

नीरज शेखर यांनी आज सकाळचे कामकाज संपल्यावर राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन खासदारकीचा राजीनामा दिला. नायडू यांनी सायंकाळी तो स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neeraj shekhar resigns from rajya sabha membership may Joins BJP