नीट परीक्षेच्या संधी वाढविण्याचा 'CBSE'चा निर्णय

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेशही यावर्षी नीट परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहेत. यापूर्वी या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी AIPMT ही परीक्षा घेण्यात येत होती. त्याऐवजी यंदापासून या सर्व परीक्षा 'नीट' अंतर्गतच होणार आहेत.

नवी दिल्ली- वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश चाचणी म्हणजे 'नीट' परीक्षा देण्याची मर्यादा वाढविण्यात आल्या आहेत. 'नीट'साठी तीनऐवजी चार संधी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. ही परीक्षा अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देता येईल. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तथा 'CBSE'ने हा निर्णय घेतला आहे. 2017 मध्ये ही परीक्षा दिल्यास हा पहिला प्रयत्न समजला जाईल. याआधी 'नीट' परीक्षा फक्त तीन वेळाच देता येत होती. परंतु यावर्षीपासून या संधी वाढवल्या जातील. नक्की किती संधी वाढवल्या जातील याबाबत मात्र CBSE कडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 
एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेशही यावर्षी नीट परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहेत. यापूर्वी या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी AIPMT ही परीक्षा घेण्यात येत होती. त्याऐवजी यंदापासून या सर्व परीक्षा 'नीट' अंतर्गतच होणार आहेत.

तीन वेळाच परीक्षा देण्याच्या अटीमुळे काही विद्यार्थ्यांना 27 मे 2017 रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचा अर्ज भरता आला नव्हता. परंतु आता सर्व विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता येणार आहे.
 
Web Title: NEET 2017: Three Attempts Only Rule Relaxed For Aspirants