नीट परीक्षेचा निकाल जाहीर

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

देशभरातून 13 लाख 26 हजार 725 विद्यार्थ्यांनी दिलेल्या नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. cbseneet.nic.in या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. देशभरातील विविध केंद्रांवर 7 मे ला झालेली नीट 2018 परीक्ष हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, मराठी, ओरिया, बंगाली, आसामी, तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये घेण्यात आली होती.

पुणे : देशभरातून 13 लाख 26 हजार 725 विद्यार्थ्यांनी दिलेल्या नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. cbseneet.nic.in या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. देशभरातील विविध केंद्रांवर 7 मे ला झालेली नीट 2018 परीक्ष हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, मराठी, ओरिया, बंगाली, आसामी, तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये घेण्यात आली होती. 

कल्पना कुमारी ही विद्यार्थींनी  691 गुण मिळवून देशात पहिली आली आहे. तर कृष्णा अग्रवाल या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने 685 गुण मिळवत देशात सातवा येणाचा मान मिळवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेच्या निकालाला स्थगितीस देण्यास नकार दिली. त्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएससी) आज निकाल जाहीर करण्यात आला. एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी सीबीएसईकडून ही प्रवेश परिक्षा घेतली जाते. हा निकाल 5 जून रोजी जाहीर होणार होता. मात्र, न्यायालयाने स्थगिती दिल्याने निकाल एक दिवस आधीच जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीयसाठी झालेली नीट प्रवेश परीक्षा 6 मे ला देशभरातील 2255 केंद्रांवर घेण्यात आली होती.

कट ऑफ
तज्ञांच्या मते खुला वर्गातील विद्यार्थ्यांना पात्रतेसाठी एकुण गुणांच्या किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत. 720 पैकी किमान 131 पर्सेंनटाइल आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पात्रतेसाठी एकूण गुणांच्या 40 टक्के म्हणजे 107 पर्सेंटाइलची गरज आहे. तसेच अपंग विद्यार्थ्यांना पात्रतेसाठी 118 पर्सेंटाइलची गरज आहे.   

Web Title: NEET exam results declared