NEET-PG परीक्षांचा निकाल जाहीर, मंडावियांनी ट्वीटवरून दिली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NEET PG Exams Updates

NEET-PG परीक्षांचा निकाल जाहीर, मंडावियांची माहिती

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने (NBE) बुधवारी NEET PG परीक्षांचे निकाल जाहीर केले असून ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर पाहू शकणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. यंदा NBE ने विक्रमी 10 दिवसात NEET PG चा निकाल जाहीर केला आहे. 21 मे 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. जाहीर करण्यात आलेला निकाल विद्यार्थ्यांना nbe.edu.in वर पाहता येणार आहे. (NEET PG 2022 Result Declared )

NEET PG चा निकाल जाहीर झाल्यानंतर आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, "NEET PG चा निकाल जाहीर झाला असून, NEET-PG उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय त्यांनी विक्रमी दहा दिवसांत निकाल जाहीर केल्याबद्दल @NBEMS_INDIA चेदेखील कौतुक केले आहे.

हेही वाचा: राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर; 24 तासात हजारांहून अधिक बाधित

असा बघता येणार निकाल

  • निकाल पाहण्यासाठी natboard.edu.in ला भेट द्या.

  • NEET PG चा निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा.

  • आता तुम्हाला होम पेजवर NEET PG निकालाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा NEET PG चा निकाल समोर दिसेल.

हेही वाचा: NEET UG परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून रद्द

सर्वोच्च न्यायालयाकडून परीक्षा घेण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, NEET-PG 2022 परीक्षा 21 मे रोजी देशातील 267 शहरांमधील 849 केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये एकूण 2 लाख 06 हजार 301 विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. मात्र, त्यातील केवळ 1 लाख 82 हजार 318 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. घेण्यात आलेल्या परीक्षेत 200 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते.

सुप्रीम कोर्टाने NEET PG पुढे ढकलण्यास दिला होता नकार

सुप्रीम कोर्टाने अलीकडेच NEET PG 2022 ला पुढे ढकलण्यास नकार दिला होता. NEET PG पुढे ढकलल्याने अनिश्चितता निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल. तसेच, तपासणीस उशीर झाल्यास डॉक्टरांची अनुपलब्धता होईल आणि रुग्णांच्या सेवेवर गंभीर परिणाम होईल असे मत न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने दिले होते.

Web Title: Neet Pg Result 2022 Declared On Nbe Edu In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top