NEET च्या निकालावर देशात खळबळ! न्यायालयाची एनटीएला नोटीस, काय आहे प्रकरण?

सर्वोच्य न्यायालयात देखील या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली. उमेदवारांच्या एका गटाने NEET-UG, 2024 परीक्षा नव्याने आयोजित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे
NEET UG 2024
NEET UG 2024esakal

NEET UG 2024: NEET परीक्षेचा निकाल 2024 जाहीर झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रामाणिकपणावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यंदाच्या निकालात असे ६७ विद्यार्थी आहेत ज्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. निकाल पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण झाले की इतक्या मुलांना पूर्ण गुण कसे मिळाले? तेही निगेटिव्ह मार्किंग असूनही? या सर्व प्रश्नांदरम्यान आता कलकत्ता उच्च न्यायालयाने 2024 नीट (यूजी) परीक्षा आयोजित करताना कथित अनियमिततेवर प्रश्नचिन्ह असलेल्या याचिकेवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून उत्तर मागितले.

न्यायमूर्ती अपूर्व सिन्हा रे आणि न्यायमूर्ती कौशिक चंदा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की लागू मार्किंग/स्कोअरिंग सिस्टमनुसार काही उमेदवारांना जास्तीत जास्त संभाव्य 720 गुणांपैकी 718 किंवा 719 गुण मिळू शकत नाहीत.

त्यानुसार, न्यायालयाने एनटीएला रिट याचिकेत केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी तारखेपासून दहा दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. गुणवत्ता यादी तयार करताना राज्य आणि केंद्र सरकारचे आरक्षण धोरण कसे पाळले गेले हेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले पाहिजे, अशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत.  

NEET UG 2024
Loksabha Result : महायुतीसाठी विधानसभेच्या आव्हानांची झलक;मराठवाड्यातील ३३ मतदारसंघांत आघाडीला, तर ९ ठिकाणीच महायुतीला लीड

सर्वोच्य न्यायालयात देखील या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली. उमेदवारांच्या एका गटाने NEET-UG, 2024 परीक्षा नव्याने आयोजित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही परीक्षा 5 मे रोजी झाली. 5 मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

NEET UG 2024
Lok Sabha 2024:  तुरूंगात दहशतवादाची शिक्षा भोगणाऱ्या ‘त्या’ दोघांचा शपथविधी कुठे होणार? संसदेत की तुरूंगात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com