

NEET Result Controversy Over Score Change
Esakal
पेपरफुटी प्रकरणानंतर रद्द झालेली नीट परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा एनटीएवर गंभीर आरोप होत आहेत. घाई गडबडीत निकाल जाहीर केला असून त्यात अनेक त्रुटी असल्याचे आरोप काही विद्यार्थ्यांनी केलेत. आर्या सिंह नावाच्या कानपूरमधील विद्यार्थीनीने परीक्षेच्या ओएमआर शीट आणि फायनल अन्सर की यानुसार वेगळे, निकाल जाहीर होताच वेगळे आणि काही तासांनी वेगळे गुण दाखवल्याचा दावा केलाय.