नेताजींच्या अस्थी आणण्याकडे सर्व सरकारांचे दुर्लक्ष : रे

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कोणीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी खंत नेताजी यांचे पणतू आशिष रे यांनी आज व्यक्त केली. 

कोलकता: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कोणीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी खंत नेताजी यांचे पणतू आशिष रे यांनी आज व्यक्त केली. 

आशिष रे यांनी सुभाषबाबूंच्या मृत्यूबाबत एक पुस्तक लिहिले असून त्यात त्यांनी या मृत्यूमागील गूढ आणि वाद याबाबत टिपण्णी केली आहे. सुभाषबाबूंच्या अस्थी टोकियोमधील रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या आहेत. "नेताजींच्या बेपत्ता होण्यामागील सत्य आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी मान्य केले आहे. तरीही त्यांच्या अस्थी परत आणण्यासाठी कोणीही फारसे प्रयत्न केले नाहीत. नेताजींच्या अस्थी सांभाळून ठेवण्याचा खर्चही भारत सरकारतर्फे दिला जातो. त्याच्या अस्थी परत आणण्यास नेताजींच्याच काही कुटुंबीयांचा आणि काही राजकीय पक्षांचा विरोध आहे. मात्र, या सर्वांशी चर्चा करण्याचेही प्रयत्न कोणत्याही सरकारने केले नाहीत,' असे रे यांनी म्हटले आहे. रे यांनी त्यांच्या पुस्तकात नेताजींच्या मृत्यूबाबत झालेल्या विविध अकरा तपास कार्याचा आढावा घेतला आहे. नेताजींच्या स्मृतींकडे दुर्लक्ष करून देशाने त्यांच्यावर मोठा अन्याय केल्याची भावना रे यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: Neglected by all governments to bring Netaji