आम्हाला फरक पडत नाही- चिन्नम्मा

पीटीआय
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पनीरसेल्वम यांनी मंगळवारी रात्री अचानकपणे बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शशिकला यांनी ही बैठक बोलावली होती. 

चेन्नई- माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी आव्हान दिल्यानंतर पक्षाला अशा धमक्यांनी काही फरक पडणार नाही, असे सांगत अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही.के. शशिकला तथा चिन्नम्मा यांनी पक्षात एकजूट असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

"अण्णा द्रमुकमध्ये गद्दारीचा कधीही विजय होणार नाही. कट्टर प्रतिस्पर्धी द्रमुक आमच्या पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे," असा आरोप शशिकला यांनी केला. 

स्वतःच्या पक्षनेतेपदी झालेल्या निवडीचा संदर्भ देत शशिकला म्हणाल्या, 'आतापर्यंत न दिसणारे विरोधक आता डोके वर काढू लागले आहेत. म्हणजेच आमच्या प्रतिस्पर्ध्यांना जे नको आहे ते पक्षात घडत असल्यामुळेच ते डोके वर काढू लागले आहेत.' 
त्यामुळेच विरोधकांची ही फडफड सुरू आहे. मात्र, यामुळे मी किंवा माझा पक्ष बधणार नाही, असे त्यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत सांगितले. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी रात्री अचानकपणे बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी ही बैठक बोलावली होती. 
 

Web Title: Neither AIADMK nor me will be cowed down, says sasikala