

97-year-old Nepal woman rescued alive after 4 hours under debris.
sakal
काठमांडू (पीटीआय) : डोळ्यांसमोर घर वाहून जात होते... जीव वाचविण्यासाठी सगळे जण सैरावैरा धावत होते...कुणी डोंगर चढत होते, कुणी जंगलाचा आसरा घेत होते. पाण्याचा रौद्र प्रवाह आणि चिखलाच्या लोंढ्याने सारे काही गिळंकृत केले. मात्र, अशा परिस्थितीत मृत्यू समोर असतानाही नेपाळमधील अनेकांनी हार मानली नाही. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती माणसाला किती ताकद देते, याची साक्ष देणाऱ्या या कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत. या संकटातून वाचलेल्या ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची कहाणी त्याचेच प्रातिनिधिक रूप! जगण्याची हीच उमेद या आजींसह अनेकांच्या आयुष्याला बळ देणारी ठरली आहे.