

Nepal Floods Kill 359 People Over 1500 Missing As 288 Indian Tourists Remain Untraced India Begins Rescue Operations
sakal
काठमांडू: पाण्याच्या धारदार प्रवाहामुळे अक्षरशः खरडून निघालेली जमीन, चिखलामध्ये रुतलेले अगणित श्वास अन् त्यांच्या मदतीसाठी जगभरातून पुढे आलेले मदतीचे असंख्य हात, असे चित्र देवभूमी नेपाळमध्ये पाहायला मिळत आहे. या जलप्रलयातील मृतांची संख्या ३५९ वर पोचली असून, दीड हजारापेक्षा अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये २८८ भारतीय पर्यटकांचाही समावेश आहे.