

An 11-year-old boy searches for his father who went missing after being swept away in the Nepal floods
esakal
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वडील वाहून गेल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी बिहारमधील मोतिहारी येथील ११ वर्षीय धर्म कुमार उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये दाखल झाला आहे. वडिलांच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांसह त्याने त्यांचा शोध सुरू केला असून, गंडक नदीच्या काठावर ते सापडतील, अशी आशा त्याला आहे.