नेपाळ रचतोय भारताविरोधात कट? लिपुलेखमध्ये चिनी सैन्य तैनात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नेपाळ चीनला सोबत घेऊन भारताविरोधात काही कट रचत आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. कारण लिपूलेखमध्ये चीनच्या हालचाली वाढल्या आहेत.

नवी दिल्ली- नेपाळ चीनला सोबत घेऊन भारताविरोधात काही कट रचत आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. कारण लिपूलेखमध्ये चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीन लडाखमधून आपले सैन्य मागे घेणार असल्याचं म्हणत असला तरी चीनने लिपुलेख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 1 हजार सैनिक तैनात केले आहेत. लिपुलेख हा भारत, चीन आणि नेपाळ या देशांच्या सीमा एकत्र येणारा भाग असून काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना लस संशोधनात रशिया सगळ्यांत पुढं; लसीकरण सुरू होणार?

चीन लडाखनंतर आता लिपुलेखमध्ये आपले सैन्य तैनात करत आहे. चीनने सैनिकांची एक बटालियन म्हणजे जवळजवळ 1 हजार सैनिक या ठिकाणी तैनात केले आहेत. दुसरीकडे भारतानेही तेव्हड्याच प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. 

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. 45 वर्षानंतर 15 जून रोजी सीमेवर हिंसा झाली. त्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनने आपली जीवितहानी झाल्याचं मान्य केलं असलं तरी मृत जवानांचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे. दोन्ही देशातील लष्करी स्तरावरील चर्चेनंतर सीमा भागात सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच चीन लिपुलेख येथे सैनिक जमवत आहे.

अनलॉक 3: देशांतर्गत प्रवासाचे नियम कसे असतील जाणून घ्या

लिपुलेखवर नेपाळचा दावा

भारताने मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख जवळूनच रस्ता बनवला आहे. भारताने येथे 80 किलोमीटरचा रस्ता बनवल्यानंतर नेपाळने यावर आपत्ती घेतली होती. त्यामुळे लिपुलेख चर्चत आला आहे. त्यानंतर नेपाळने आपल्या संविधानात बदल करत नव्या नकाशाला मान्यता दिली होती. नेपाळने लिपुलेख, कालापाणी आणि लिपियाधूरा या भागांना नव्याने आपल्या नकाशात दाखवले आहे. चीन लिपूलेखमध्ये सैन्य तैनात करत असल्याने भारताला नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. 

पूर्व लडाखमध्ये भारताची जमीन बळकावू पाहणारा चीन पैंगोंग त्सोमधील फिंगर 4 ते 8 येथून मागे हटण्यास तयार नाही. चीनने काही भागातून आपले सैन्य मागे घेतले असले तरी अक्साई चीनच्या भागात चीन मोठ्या संघर्षाची तयारी करत आहे. सॅटेलाईट फोटोंमध्ये चीन सैतुला सैन्य ठिकाण्याला आधुनिक बनवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nepal new plan for india chinies army in lipulekh