नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात!

चंद्रा बोस यांची पंतप्रधानांना विनंती
netaji subhas chandra bose
netaji subhas chandra bosesakal

कोलकता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्‍थी जपानमधील रेणकोजी मंदिरात ठेवलेल्या आहेत, त्या भारतात आणावा, अशी विनंती नेताजींचे पुतणे चंद्रा बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. नेताजी जिवीत असण्याचे कोणताही पुरावा १९४५ नंतर मिळालेला नाही. त्यांचे निधन झाले आहे, याची खात्री आता पटली आहे, असे चंद्रा म्हणाले. नेताजी बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, या समजाला चंद्रा बोस हे पूर्वी आक्षेप होता. नेताजी यांची कन्या समजल्या जाणाऱ्या अनिता बोस- प्लाफ यांची डीएनए चाचणी झाल्यानंतर त्यांच्या हस्ते नेताजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यास परवानगी द्यावी. यामुळे नेताजींच्या मृत्यूबद्दलचा वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला तरी थांबण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. नेताजींच्या विमान अपघातातील मृत्यूबद्दल चंद्रा बोस यांचे आजोबा सरतचंद्र बोस आणि वडील अनितानाथ बोस यांनीही सातत्याने सवाल उपस्थित केले होते.

अनिता बोस-प्लाफ या जर्मनीच्या अर्थतज्ज्ञ असून वडील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी ताईहोकू (आताचे तैपई) येथे विमान अपघातात झाला, यावर त्यांचा विश्‍वास आहे. नेताजींसंबंधी उपलब्ध अवर्गीकृत फाइलच्या सखोल तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटली आहे. १९४५नंतर नेताजी जिवंत असल्याचा थोडा तरी मागोवा मिळाला असता तर अँग्लो-अमेरिकन सैन्याने नक्कीच त्यांचा शोध घेतली असता, असे मत चंद्रा बोस यांनी व्यक्त केला. नेताजी जिवंत आहेत की मृत, यासंबंधी मतभेदांमुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबात दोन गट पडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com