सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची विटंबना 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

कोलकता - येथील नरकेलडांगा भागात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना आज सकाळी येथे उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेबद्दल फॉवर्ड ब्लॉकच्या कार्यकर्त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे, असे कोलकता पोलिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेताजींच्या पुतळ्याची काल रात्री किंवा सायंकाळी विटंबना झाली आहे. आज सकाळी ही घटना काही रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आमच्या नजरेस ही घटना आणून दिली. या प्रकरणी आम्ही तपास करीत आहोत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून 24 तासांत पोलिसांनी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही पोलिस ठाण्याच्याबाहेर आंदोलन करू, असे फॉरवर्ड ब्लॉकच्या युथ ब्लॉकचे महासचिव सुदीप्तो बॅनर्जी यांनी सांगितले. 

Web Title: Netaji Subhas Chandra Bose's statue vandalised in Kolkata