नेताजींच्या चालकाचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

आझमगड : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चालक व स्वातंत्र्यसेनानी निझामुद्दीन यांचे आज वयाच्या 116 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

उत्तर प्रदेशमधील धाखवा येथील मूळ रहिवासी असलेले निझामुद्दीन यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. निझामुद्दीन आझाद हिंद सेनेत कर्नल पदावर कार्यरत होते. आपण नेताजींचे विश्‍वासू सहकारी असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Web Title: netaji subhash chandra's driver nizamuddin dies