नेटकरी म्हणतात, मोदी का घमंड हारा ! | Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi
नेटकरी म्हणतात, मोदी का घमंड हारा !

नेटकरी म्हणतात, मोदी का घमंड हारा !

नवी दिल्ली : आज शुक्रवारी (ता.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. दुसरीकडे सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहिल असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी इशारा दिला आहे. सध्या ट्विटवर '#मोदी_का_घमंड_हारा' हा हॅशटॅग टेंडिंगमध्ये आहे. एकोणीस हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा हॅशटॅग वापरला आहे. अनेकांनी मोदींविरोधात संताप व्यक्त केल्याचे दिसत आहे. हंसराज मिना म्हणतात, की टूटला अभिमान, जिंकला माझ्या देशातील शेतकरी. त्यामुळे #मोदी_का_घमंड_हारा कष्टाने शेतकरी खडकाळ जमिनीही सुपीक बनवतो. (Farm Laws Repeal)

हेही वाचा: घोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका

येथे तर एकच राजा सत्तेत मदमस्त झाला होता, असा टोला अंजनेय यादव यांनी मारला आहे. लोकशाहीतील हा ऐतिहासिक दिवस असल्याचे प्रिया यांनी म्हटले आहे. हमीज रहमान म्हणतात, की ५६ इंचाचे आता ५.६ इंचाचे झाले.

पंतप्रधानांची अरेरावी संपली आहे. मोदी हिटलर कालखंड संपला, अशा शब्दांत राममूर्ती होळकर यांनी टीका केली आहे.

loading image
go to top