घोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका | Kirit Somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya
घोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका

घोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका

औरंगाबाद : घोटाळ्याबाजांवर शरद पवार (Sharad Pawar) बोलत नसल्याची टीका, भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली. आज शुक्रवारी (ता.१९) औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या म्हणाले, की अर्जुन खोतकरांनी बेनामी पद्धतीने जालना सहकारी साखर कारखाना फसवणुकीतून हस्तगत केला आहे. काही दिवसांपूर्वी तापडिया आणि मुळे यांच्यावर ईडीच्या धाडी ज्या पडल्या त्या या संबंधितच होत्या, असे त्यांनी सांगितले. कारखान्यासाठी अर्जुन खोतकरांनी २०१२ पासून षडयंत्र सुरु केले होते. अनेक शेतकऱ्यांना माझ्याकडे (Aurangabad) तक्रारी दिल्या आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारचे सहकार सचिवांकडे १ हजार कोटी रुपयांचा जमीन बळकवल्याची तक्रार केली आहे.

हेही वाचा: आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू भावूक होऊन रडू लागले

शेतकरी संबंधित लोकांना भेटण्यासाठी मी येथे आलो होतो. काही दिवसांत कडक कारवाई सुरु होईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे.

टॅग्स :Sharad PawarKirit Somaiya