शशिकलांच्या निवडीनंतर सोशल मीडियावर खिल्ली

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी व्ही. के. शशिकला यांची रविवारी निवड झाल्यानंतर तमिळनाडूच्या नागरिकांनी सोशल मीडियातून जोरदार खिल्ली उडविली.

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी व्ही. के. शशिकला यांची रविवारी निवड झाल्यानंतर तमिळनाडूच्या नागरिकांनी सोशल मीडियातून जोरदार खिल्ली उडविली.

काही चित्रपटांतील दृश्‍यांच्या छायाचित्रांचे अनुकरण करून त्याद्वारे फेसबुक आणि ट्‌विटरवर खिल्ली उडविणारे यामध्ये आघाडीवर होते. तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याच्या शशिकला यांच्या घटनेची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याशी करण्यात आली आहे. काही प्रसिद्ध चित्रपटांतील दृश्‍यांद्वारे शशिकला आणि मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे विडंबन करण्यात आले असून, सोशल मीडियावर यासंबंधी मोठी चर्चा सुरू आहे.

Web Title: netizens make fun of sasikala