esakal | आता ड्रोनद्वारे घरातील चित्रण; ॲमेझॉनच्या सुरक्षा उपकरणांमुळे नेटिझन्स चिंतित 
sakal

बोलून बातमी शोधा

drone

अॅमेझॉनच्या ड्रोनला अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि तज्ज्ञांनी विरोध केला असून यामुळे व्यक्तीच्या खासगीपणाच्या हक्काला नख लागू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

आता ड्रोनद्वारे घरातील चित्रण; ॲमेझॉनच्या सुरक्षा उपकरणांमुळे नेटिझन्स चिंतित 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ॲमेझॉन या कंपनीने आता अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रामध्ये हातपाय पसरायला सुरवात केली आहे. घरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या ड्रोनप्रमाणेच वाहनांसाठीच्या कार अलार्मसारखी उत्पादने बाजारात आणण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. अमेझॉनने २०१८ मध्येच स्मार्ट डोअरबेल मेकर कंपनी रिंगची खरेदी केल्यानंतर कंपनीचा या क्षेत्रातील दबदबा वाढत गेला होता. आता याच कंपनीकडून घराच्या आतील व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची क्षमता असणारे ड्रोन बाजारामध्ये आणले जाणार आहेत. कंपनीच्या या उपकरणांवर नेटिझन्सनी चिंता व्यक्त केली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीने पुढील वर्षी हे ड्रोन बाजारामध्ये आणण्याची घोषणा केली असून ते केवळ २४९ डॉलरमध्ये खरेदी करता येईल. हे ड्रोन एखाद्या घराभोवती फिरत आतील चित्रीकरण करू शकेल. अर्थात या उपकरणाचा वापर केवळ सुरक्षेच्या कारणास्तव वापर केला जाणे अपेक्षित आहे. ॲमेझॉनने क्लाउड गेमिंग सर्व्हिस लुना बरोबरच अन्य काही सुरक्षा उपकरणे बाजारात आणण्याची घोषणाही केली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डिजिटल प्रायव्हसीचे काय? 
अॅमेझॉनच्या ड्रोनला अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि तज्ज्ञांनी विरोध केला असून यामुळे व्यक्तीच्या खासगीपणाच्या हक्काला नख लागू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या देशांमध्ये डिजिटल प्रायव्हसीबाबतची धोरणे स्पष्ट ठरलेली नाहीत अशा देशांमध्ये ही उपकरणे संकट निर्माण करू शकतात अशी भीती काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर उघडपणे व्यक्त केली आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी २०१३ मध्ये ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक घरी उत्पादनांची डिलिव्हरी पोचविण्याची घोषणा केली होती. आता ही घोषणा आगामी काळामध्ये प्रत्यक्ष येऊ शकते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top