हिंदू दहशतवाद नाही तर संघी दहशतवाद हा शब्दप्रयोग - दिग्विजय सिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

कधीच हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग आपण केलेला नाही, आपण नेहमी संघी दहशतवादाबद्दल बोललो बोललो आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी (ता.15) दिले आहे. देशातील वाढत्या दहशतवादाबद्दल अनेकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. 

नवी दिल्ली - कधीच हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग आपण केलेला नाही, आपण नेहमी संघी दहशतवादाबद्दल बोललो बोललो आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी (ता.15) दिले आहे. देशातील वाढत्या दहशतवादाबद्दल अनेकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. 

सिंह म्हणाले की, मी हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग करतो ही चुकीची माहीती आहे. आपण असा शब्दप्रयोग कधीच केलेला नाही.दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, धर्माच्या आधारे दहशतवाद केला जात नाही. तसेच कोणताच धर्म दहशतवादाला पाठिंबा देत नाही. हे सगळे संघाच्या विचारसरणीमुळे घडत आहे. मालेगाव, मक्का मशिद आणि समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) हिंसाचार केलेले आहेत. हा संघी दहशतवाद आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा सहभागी आहे.

दरम्यान, भाजप खासदार संजय पाठक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही धर्माने कोणतीही गुन्हा केलेला नाही. अतिरेकी लोक चुकीच्या पद्धतीने धर्माला प्रस्थापित करतात. भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती 'हिंदू' आहे. याव्यतिरिक्त, भारतात कोणताही धर्म किंवा जात नाही.

Web Title: Never used the term Hindu terrorism spoke about Sanghi terror says Digvijaya Singh