नवी कोरी गाडी, शोरूममधून बाहेर काढताना अचानक स्पीड वाढलं; रस्त्यावर दुचाकीला उडवलं, CCTV VIDEO VIRAL

New Car Accident: शोरूममधून कार बाहेर काढत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार शोरूमसमोरील बॅरिकेड तोडून रस्त्यावर गेली. त्यावेळी समोरून जाणाऱ्या दुचाकीला धडकली.
New Car Accident

New Car Accident Captured on Shocking CCTV Video

Esakal

Updated on: 

Viral Video: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवी कोरी गाडी शोरूममधून बाहेर काढतानाच भीषण अपघात झाला. या अपघातामुळे नव्या गाडीच्या खरेदीचा आनंद काही क्षणच टिकला. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर शहरात ही घटना घडली. शोरूममधून कार बाहेर काढत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार शोरूमसमोरील बॅरिकेड तोडून रस्त्यावर गेली. त्यावेळी समोरून जाणाऱ्या दुचाकीला धडकली. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com