चिंता वाढली! 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटन्टचा शिरकाव

corona_pune
corona_pune

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याची स्थिती निर्माण झाली होती. पण, मार्च महिन्यापासून रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. विशेषत: काही राज्यांमध्ये कोरोना स्थिती गंभीर बनली आहे. त्यातच आणखी एक चिंता वाढवणारी  माहिती समोर येत आहे. कोरोनाचा डबल म्युटन्ट वेरिएंट देशातील १८ राज्यांमध्ये आढळून आला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. हा डबल म्युटन्ट वेरिएंट जगातील अनेक देशांमध्ये आढळून आला होता. आता त्याचा भारतातची शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. एक इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिलंय. 

कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून या विषाणूने अनेक वेगवेगळे रुप धारण केले आहेत. अनेक अभ्यासात हे नवे स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात आलंय. आता हा नवा म्युटन्ट भारतातही आढळून आल्याचं केंद्र सरकारने मान्य केलंय. सरकारने दिलेल्या माहितीनुसार १८ राज्यांमध्ये एकूण ७७१ डबल म्युटन्ट वेरिएंट रुग्ण आढळून आले आहेत. यातील ७३६ रुग्णांमध्ये यूकेमध्ये सापडलेल्या स्ट्रेनशी साधर्म्य दाखवणार म्युटंट आढळला आहे, तर ३४ रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या स्ट्रेनशी साधर्म्य दाखवणारा म्युटन्ट आढळलाय.

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४७ हजार २६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळळे आहेत. तर २३९०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २४ तासांतील मृत्यूचा आकडाही वाढला आहे. गेल्या २४ तासांत देशात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटी १७ लाख ३४ हजार ०५८ इतकी झाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या वाढता वाढता वाढत आहे. देशात आतापर्यंत ठणठणीच झालेल्यांची संख्या एक कोटी १२ लाख ०५ हजार १६० इतकी आहे. दुसरीकडे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येनं साडेतीन लाखाचा पल्ला ओलांडला आहे. सध्या भारतामध्ये तीन लाख ६८ हजार  ४५७ जणांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एक लाख ६० हजार ४४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. देशात यावेळी कोरोनाचे ५२५ रुग्ण आढळले होते. लॉकडाऊन करुनही देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीच राहिली. लॉकडानचा फारसा काही उपयोग झाला नसल्याचं पाहायला मिळालं. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com