दिल्ली: दिवसाढवळ्या महिलेवर चाकू हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद; महिलेचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

ईशान्य दिल्लीत मंगळवारी दिवसाढवळ्या एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. दरम्यान आज (गुरुवार) महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत मंगळवारी दिवसाढवळ्या एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. दरम्यान आज (गुरुवार) महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

ईशान्य दिल्लीत मंगळवारी एका 21 वर्षाच्या महिलेवर चाकूने हल्ला झाला होता. ज्या इमारतीखाली हा प्रकार घडला त्या इमारतीशेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली आहे. व्हिडिओमध्ये पीडित महिला एका व्यक्तीसोबत भांडत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याने महिलेले चाकूने भोसकल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही क्षणातच ते दोघेही कॅमेऱ्यापासून दूर गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली आहे. त्याचे नाव आदिल असून त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्यावर यापूर्वी मोटारी चोरल्याचा गुन्हा दाखल आहे. हल्लेखोराने आपल्या मुलीवर का हल्ला केला, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याच्या प्रतिक्रिया मृत महिलेच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: New Delhi attack women news cctv news marathi news sakal news