BJP : भाजप राबविणार सामाजिक न्याय सप्ताह

अदानी प्रकरण आणि राहुल गांधींच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या विरोधी पक्षांना तोंड देण्यासाठी आक्रमकपणे लढण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिले आहेत.
BJP MP March
BJP MP Marchsakal
Summary

अदानी प्रकरण आणि राहुल गांधींच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या विरोधी पक्षांना तोंड देण्यासाठी आक्रमकपणे लढण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिले आहेत.

नवी दिल्ली - अदानी प्रकरण आणि राहुल गांधींच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या विरोधी पक्षांना तोंड देण्यासाठी आक्रमकपणे लढण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिले आहेत. तसेच भाजपतर्फे सहा एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत सामाजिक न्याय सप्ताह राबविला जाणार असून सरकारच्या नऊ वर्षाच्या काळातील योजनांच्या प्रचारासाठी १५ मे ते १५ जूनदरम्यान राबविल्या जाणाऱ्या मोहिमेसाठी पंधरा दिवसात कृती आराखडा तयार करण्यासही पंतप्रधानांनी भाजप खासदारांना सांगितले आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उत्तरार्धामध्ये भाजप संसदीय पक्षांची पहिली बैठक आज झाली. भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा सभागृह नेते, मंत्री पीयूष गोयल सरकारमधील मंत्री, दोन्ही सभागृहांमधील खासदार उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्रिपुरा, मेघालय, नागालॅंड विधानसभेतील विजयासाठी तसेच शानदार अर्थसंकल्पासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पक्ष खासदारांना विरोधकांचा मुकाबला करण्यास सांगितले. भाजपची जसजशी प्रगती होईल, तेवढ्याच वेगाने विरोधकांकडून भाजपवर तीव्रतेने हल्ले होतील. त्यामुळे मोठ्या संघर्षासाठी सर्वांनी तयार राहायला हवे, असे पंतप्रधानांचे म्हणणे होते.

२०२४ च्या निवडणुकीच्या तयारीचे संकेत देताना पंतप्रधान मोदींनी खासदारांना आपापल्या मतदारसंघामध्ये सक्रियता वाढविण्याबरोबरच सरकारी योजनांसाठी प्रचार मोहीम राबविण्याचे तसेच सामाजिक मोहिमांमध्ये सहभागी होण्याचेही आवाहन केले. सर्व खासदार १५ मे ते १५ जून या महिनाभरात योजनांचा प्रचार कशा पद्धतीने करता येईल यासाठीचा कृती आराखडा खासदारांनी पंधरा दिवसात आपल्या कार्यालयाकडे सादर करावा, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचे या बैठकीनंतर संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितले.

सहा एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस असून १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या संपूर्ण कालावधी सामाजिक न्याय सप्ताह साजरा करण्याची सूचनाही पंतप्रधान मोदींनी पक्ष खासदारांना केली. तसेच ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी आपापल्या भागातील वैशिष्ट्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी खासदारांना आणि जनतेला केल्याचे देखील राज्यमंत्री मेघवाल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com