'लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न'

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली: विरोधकांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवून मोदी सरकार लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वत:चा धोरणात्मक लकवा लपविण्यासाठीच सरकारचा हा खटाटोप सुरू असल्याचे पक्ष प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधात "सीबीआय'ने आरोपपत्र दाखल केल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरजेवाला यांनी हा आरोप केला आहे.

अशा प्रकारच्या राजकीय कारस्थानांसमोर आमचा पक्ष कधीही गुडघे टेकणार नाही, जनक्षोभाला दुसऱ्या दिशेने वळविण्यासाठीच भाजप जाणीवपूर्वक अशा प्रकारचे प्रयत्न करत असून, आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच ही पावले उचलली जात आहेत. काँग्रेसची प्रतिमा कलुषित करण्यासाठीच सरकार बोफोर्स प्रकरण जिवंत ठेवू पाहात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: new delhi modi government congress bhupinder singh hooda