लोक केवळ तमाशा पाहतात; न्यायालयाचे ताशेरे

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

नवी दिल्ली : गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणारे लोक केवळ तमाशा पाहतात, ते चौकशीदरम्यान पोलिसांना मदतही करत नाहीत, असे निरीक्षण दिल्लीतील न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नोंदविले. दहा वर्षांच्या मुलीचा एक अज्ञात व्यक्ती पाठलाग करत होती, सुरवातीस तिने या मुलीस पैशांचे आणि नंतर खाद्यपदार्थांचे प्रलोभन दाखवित तिला फूस लावण्याचा प्रयत्न केला. ज्या परिसरामध्ये ही घटना घडली तेथील शेजाऱ्यांनी आणि वाटसरूंनीही या प्रकरणात पुढाकार घेऊन न्यायालयासमोर साक्ष देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयास केवळ पीडितेच्या साक्षीवर विसंबून राहावे लागले होते.

संबंधित मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पाठलाग करणाऱ्या आरोपीस 18 महिने तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. सर्वसामान्य लोकांना पोलिस आणि न्यायालयाची पायरी चढायची नसते, त्यामुळे ही मंडळी अशा प्रकरणात पुढाकार घेत नाहीत असे मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अश्‍विनीकुमार सरपाल यांनी नोंदविले.

तपास अधिकाऱ्याचा पाठपुरावा
या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी पीडित मुलीचे शेजारी आणि वाटसरू यांच्याशी संपर्क साधत त्यांना पुढाकार घेत न्यायालयात साक्ष देण्याची विनंती केली होती; पण त्यांनी यास नकार दिला होता. न्यायालयाने सूरज या आरोपीस अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. न्यायालय याप्रकरणी पुढील आठवड्यामध्ये दोषीस शिक्षा ठोठावणार आहे.

Web Title: new delhi news accident and court statement