पन्नास कोटींवरील कर्जासाठी पारपत्र तपशील बंधनकारक

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

नवी दिल्ली : कर्ज बुडवून विदेशात पलायन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने केंद्र सरकारने 50 कोटी रुपयांवरील कर्जासाठी कर्जदाराला पारपत्राचे तपशील देणे बंधनकारक केले आहे.

कर्ज बुडवून एखादा कर्जदार विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असेल, तर तातडीने बॅंक तपास यंत्रणांना याची माहिती देऊ शकते. संबंधित कर्जदाराच्या पारपत्राचे तपशील बॅंकेकडे उपलब्ध असल्याने त्याला विदेशात पळून जाण्यापासून रोखता येऊ शकते. विजय मल्ल्या, जतीन मेहता, नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी हे उद्योगपती मोठ्या प्रमाणात कर्ज बुडवून विदेशात पळून गेले आहेत. यामुळे त्यांच्याकडून कर्जवसुली करणे अवघड बनले आहे.

याबाबत आर्थिक सेवा विभागाचे राजीव कुमार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की स्वच्छ आणि जबाबदार बॅंकिंग व्यवस्थेच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. यासाठी 50 कोटी रुपयांवरील कर्जासाठी कर्जदाराच्या पारपत्राचे तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहेत. गैरव्यवहार झाल्यास तातडीने कारवाई करण्याच्या दिशेने हे तपशील महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्व बॅंकांनी 50 कोटी रुपयांवरील कर्ज घेणाऱ्या कर्जदारांच्या पारपत्राचे तपशील 45 दिवसांत द्यावेत, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

Web Title: new delhi news bank loan passport