बिल्किस बानोप्रकरणी भगोराची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

सर्वोच्च न्यायालयात शिक्षा कायम

नवी दिल्ली: गुजरातमधील 2002 च्या बिल्किस बानो बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दोषी आयपीएस अधिकारी आर. एस. भगोरा यांच्यासह चार पोलिस अधिकारी आणि दोन डॉक्‍टरांची याचिका फेटाळून लावली. या वेळी आरोपींना सुनावलेली शिक्षा कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने, आपण डॉक्‍टर असूनही पोलिसांच्या म्हणण्यानुसार अहवाल तयार केला आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिला नाहीत, अशा शब्दांत दोन डॉक्‍टरांना सुनावले.

बलात्कार प्रकरणातील दोषींनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुटीकालीन पीठाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला होता. या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, शिक्षा भोगल्यामुळे भगोरा हे अगोदरच तुरुंगातून बाहेर आले आहेत. या प्रकरणात कोणतीही घाई नसून, सध्या उच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थागिती देण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही, असे स्पष्ट केले. भगोरा यांना सुनावणी न्यायालयाने निर्दोष असल्याचे सांगितले होते. भगोरा यांनी जेवढी शिक्षा भोगली आहे, तेवढी पुरेशी असल्याचे सांगत 15 हजारांचा दंड ठोठावला होता. भगोरा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी केली होती.

Web Title: new delhi news bilkis bano case and court