भाजप- पीडीपी युतीचा अजेंडा अबाधित: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पंतप्रधान मोदी यांचे मेहबूबा यांना आश्‍वासन; "कलम 370'ला पाठिंबा

नवी दिल्लीः जम्मू- काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे "कलम 370' आणि राज्यातील स्थानिक नागरिकांना विशेषाधिकार देणारे कलम "35 अ' याच मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने पिपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) बरोबर युती केली आहे. युतीचे हे मुद्दे (अजेंडा) शंभर टक्के अबाधित राहतील, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे जम्मू- काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज सांगितले.

जम्मू- काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि राज्यातील स्थानिक नागरिकांना विशेषाधिकार देणारे कलम "35 अ' रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर मेहबूबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदींबरोबर झालेल्या पंधरा मिनिटांच्या चर्चेत त्यांनी जम्मू- काश्‍मीरबाबत राज्यघटनेतील कलमांचे दाखले दिले. तसेच, कलम 370 आणि कलम "35 अ' हाच भाजप आणि पीडीपी युतीचा पाया असून, त्यात कोणीही बदल करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, ""पंतप्रधान मोदी यांनी युतीबाबतच्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. युतीचे मुद्दे शंभर टक्के अबाधित राहतील, असे आश्‍वासन दिले.''

कलम "35 अ'बाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान उभे राहिल्याच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या चर्चेत मेहबूबा यांनी, कलम "35 अ'बाबत केंद्राने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका मांडावी. या कलमावरील सध्याच्या चर्चेमुळे जम्मू- काश्‍मीरमध्ये गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे. तसेच, तेथील लोकांमध्ये स्वतःची ओळख धोक्‍यात आल्याची भावना निर्माण झाल्याचे वाटत आहे. याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती असल्याने तसे काही होणार नसल्याचा संदेश लोकांमध्ये जाण्याची आवश्‍यकता आहे, असे मोदी यांना सांगितले. हे मुस्लिमबहुल राज्य असले तरी येथे हिंदू, शीख आणि बुद्ध लोकही राहतात. हे जम्मू- काश्‍मीरचे विशेष आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: new delhi news bjp pdp narendra modi and mehbooba mufti