शंभर कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयचे रांचीत छापासत्र

शंभर कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयचे रांचीत छापासत्र

नवी दिल्ली : झारखंड सरकारच्या माध्यान्ह भोजन आहाराच्या शंभर कोटी रुपये रांचीच्या भानू कंस्ट्रक्‍शनच्या खात्यात बेकायदारीत्या जमा झाल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीचे संजयकुमार तिवारी आणि सुरेशकुमार यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तसेच एसबीआयच्या माजी अधिकाऱ्याच्या घरी सीबीआयने छापासत्र मोहीम राबवली.

सीबीआयच्या तक्रारीनंतर तिवारी, संजयकुमार आणि एसबीआय (हटिया) बॅंकेचे निलंबित उप व्यवस्थापक अजय उरांव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. रांची येथे संजय तिवारी यांच्या वसुंधरा अशोकनगर एनक्‍लेव्हच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅट, कंपनीचे भागीदार सुरेशकुमार यांच्या बसंती रेसिडेन्सीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट आणि उरांव यांच्या मिसिर गोंदा आणि तुपदाना येथील घरी सीबीआयने छापे घातले. या छाप्यात शंभर कोटीपैकी काही रक्कम हस्तगत करण्यात आली आणि तसेच ऍक्‍सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड आणि चोलमंडल इन्व्हेस्टमेंटमध्ये जमा केलेल्या पैशासंबंधीचे कागदपत्रे जप्त केले. सीबीआयच्या तक्रारीत म्हटले की, एसबीआयच्या हटिया शाखेत झारखंड सरकारच्या माध्यान्ह भोजनचे बचत खाते असून, या खात्यातून नियोजनबद्धरीत्या शंभर कोटी रुपये भानू कंस्ट्रक्‍शन आणि त्यांच्या भागीदाराच्या खात्यात जमा झाले. तत्कालीन व्यवस्थापक उरांव यांनी ही रक्कम ट्रान्सफर केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर ही रक्कम तिवारी आणि भागीदाराने अन्य बॅंकेत जमा केली. त्यानंतर बॅंकेने 76 कोटी 29 लाख रुपयांची वसुली केली; मात्र, उर्वरित 23 कोटी 72 लाख 28 हजार रुपयांची वसुली करू शकली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com