'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर व्हावा

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

काँग्रेसचे निवडणूक आयोगाला आवाहन

नवी दिल्ली: आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचे आवाहन काँग्रेसकडून आज निवडणूक आयोगाला करण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेससह इतरही राजकीय पक्षांकडून केला जात आहे.

आगामी निवडणुकांमध्ये "ईव्हीएम'ऐवजी पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करण्याची विनंती करणारा ठराव काँग्रेस पक्षाच्या येथे आयोजित 84 व्या महाअधिवेशनात आज करण्यात आला. "ईव्हीएम'चा गैरवापर होत असल्याबद्दल काँग्रेसकडून चिंता व्यक्त करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेची विश्‍वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी जगभरातील मोठ्या लोकशाही राष्ट्रांनी मतपत्रिकांचा निवडणुकीत वापर पुन्हा सुरू केला असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा भाजपचा प्रस्ताव हा घटनेच्या तत्त्वांना धरून नाही, तसेच तो अव्यवहार्य आहे, असे काँग्रेसच्या ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 2019 च्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचेही ठरावात म्हटले आहे.

Web Title: new delhi news congress evm machine election voting