भारत नेपाळमध्ये आठ करार

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

देऊबा यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

नवी दिल्ली: भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामध्ये उभय देशांतील अमली पदार्थ तस्करीविरोधातील सहकार्याचाही समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधार शेरबहाद्दूर देऊबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

देऊबा यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक होती, नेपाळच्या विकासासाठी आमचा देश कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. देऊबा यांनीही नेपाळ आपल्या भूमीवरून एकही भारतविरोधी कारवाई होऊ देणार नाही, असे सांगितले. या वेळी उभय नेत्यांच्या हस्ते "कटैय्या ते कुसाहा' आणि "रक्‍सौल ते परवानीपूर' विद्युतवाहिनींचे उद्‌घाटन करण्यात आले. उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये लष्करी सज्जता आणि सुरक्षितता हे दोन्ही घटक महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी नमूद केले. देऊबा हे सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

Web Title: new delhi news Eight Agreements in India Nepal