देशात आणीबाणीसदृष्य स्थिती : यशवंत सिन्हा

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

नवी दिल्ली : सरन्यायाधीशाशी असलेल्या मतभेदावर सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी उघडपणे मत व्यक्त केलेले असताना हे प्रकरण केवळ सर्वोच्च न्यायालयापुरती मर्यादित कसे राहू शकते, असा प्रश्‍न आज भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला. देशातील स्थिती ही आणीबाणीसारखी बनली असल्याचेही सिन्हा म्हणाले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमवेत मतभेद असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केलेली असताना यशवंत सिन्हा यांनी ेखील या वादात उडी घेतली आहे. ते म्हणाले की, देशातील लोकशाही संकटात सापडली आहे. देशातील भाजपच्या नेत्यांनी या वेळी पुढे येणे गरजेचे आहे. न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर विचार करणे गरजेचे आहे. चार न्यायाधीशांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर सरन्यायाधीशांनी बैठक बोलावून चर्चा करणे आवश्‍यक आहे. मतभेद दूर करून एकमतानेच लोकशाही वाचवता येईल. परंतु, चिंतेची गोष्ट अशी लोकांना बोलण्यापासून रोखले जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यायाधीशांनी डी. राजा यांची भेट घेतल्यासंदर्भात विचारले असता सिन्हा म्हणाले की, सर्वजण घाबरलेले असून ते यावर मार्ग काढू इच्छित आहेत.

Web Title: new delhi news Emergency situation in the country: Yashwant Sinha