गुजरातमध्ये राज्यसभेसाठी आज मतदान

पीटीआय
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

अहमदाबाद: राज्यसभेसाठी उद्या (मंगळवारी) गुजरातमध्ये मतदान होत असून, सत्तारूढ भाजप आणि विरोधी काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर गुजरात याच वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपने राज्यसभा निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपकडून; तर अहमद पटेल काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत.

ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांच्या बंडखोरीसह अनेक नाट्यमय घडामोडींमुळे राज्यसभा निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सहा आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आणि त्यांनी अन्य 44 आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना बंगळूरला हलवले होते.

अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव असून, त्यांना विजयासाठी 45 मतांची गरज आहे. त्यांच्या पक्षाकडे सध्या 44 आमदारांचे संख्याबळ असून, नुकतेच ते राज्यात परतले आहेत. त्यांच्यातील कोणीही क्रॉस वोटिंग केले नाही किंवा नोटाचा पर्याय निवडला नाही आणि एक अतिरिक्त मत पडल्यास पटेल यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. शहा आणि इराणी यांच्याशिवाय भाजपने बलवंतसिंह राजपूत यांनाही रिंगणात उतरविले आहे. त्यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आणि संयुक्त जनता दल तसेच गुजरात परिवर्तन पार्टीच्या प्रत्येकी एका आमदाराच्या पाठिंब्यावर काँग्रेस पक्ष काठावर उभा आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल आमच्या पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगत काँग्रेसला चिंतेत टाकले आहे. संयुक्त जनता दलाचे आमदार छोटूभाई वसावा यांनीही त्यांच्या मतदारसंघाला काहीतरी देणाऱ्यासच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहे गणित
गुजरात विधानसभेच्या सदस्यांची संख्या 182 असून, काँग्रेसचे 57 आमदार होते. मात्र, सहा जणांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचे संख्याबळ 51वर घसरले आहे. राज्यसभेसाठी 176 आमदार मतदान करतील. भाजपकडे 121 आमदारांचे पाठबळ असल्यामुळे त्यांच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. मात्र, तिसऱ्या उमेदवारासाठी त्यांच्याकडे केवळ 31 मते शिल्लक राहात आहेत. अशा परिस्थितीत अहमद पटेल यांच्या विजयाची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: new delhi news gujrat election nota and rajya sabha