भारत-चीन नवीन अध्याय सुरू करू शकतात

वृत्तसंस्था
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांचे मत

 

नवी दिल्ली : भारत-चीनने जुने पान बदलून नवीन अध्याय सुरू करण्याची ही वेळ आहे, असे मत चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दोन्ही देशांनी द्विपक्षीय स्तरावर चांगली प्रगती केली आहे, असेही त्यांनी अर्वजून स्पष्ट केले.

चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांचे मत

 

नवी दिल्ली : भारत-चीनने जुने पान बदलून नवीन अध्याय सुरू करण्याची ही वेळ आहे, असे मत चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दोन्ही देशांनी द्विपक्षीय स्तरावर चांगली प्रगती केली आहे, असेही त्यांनी अर्वजून स्पष्ट केले.

पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनाच्या स्थापनेच्या 68 व्या वर्धापन दिनामित्त लुओ यांनी सांगितले, की या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिक्‍स संमेलनादरम्यान चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट झाली होती. या वेळी दोन्ही नेत्यांनी परस्परांमधील संबंध सुधारणे आणि सहकार्य वाढवण्यासंदर्भात संकेत दिले होते.
त्यांनी सांगितले, की आम्हाला जुनी पाने बदलून त्याच गतीने आणि दिशेने नवीन अध्याय सुरू करावा लागणार आहे. आम्ही एका तालात नृत्य करणे आवश्‍यक आहे. एक आणि एक अकरा व्हावे लागेल. चीन हा भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. आम्हाला द्विपक्षीय स्तराबरोबरच अंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय प्रकरणात खूप प्रगती करावी लागणार आहे.

डोकलामध्ये चीन आणि भारतीय सैनिकांमधील दोन महिन्यांच्या तणावानंतर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण समजण्यात येत आहे.

चीनच्या राजदूतांनी याप्रसंगी त्यांचे एक प्राध्यापक शू फैनचेंग यांचे स्मरण केले. शू यांनी 1945 पासून 1978 पर्यंत पुडुचेरीमधील अरविंदो आश्रमात वास्तव्य केले होते. त्यांनी उपनिषद, भगवद्‌ गीता आणि शाकुंतलचे संस्कृतमधून चीनी भाषेत अनुवाद केले होते.

 

Web Title: new delhi news india china New chapters can start