शेतमाल खरेदीस केंद्राचे 'नाफेड'ला 700 कोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 जून 2017

नवी दिल्ली: डाळींच्या कोसळलेल्या दरांच्या पार्श्‍वभूमीवर 2016-17 च्या रब्बी हंगामातील कडधान्ये आणि इतर शेतीमालाची "एमएसपी' दराने खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने "नाफेड'ला 700 कोटी रुपये दिले आहेत. कृषी खात्याच्या मूल्य समर्थन योजनेंतर्गत हा निधी दिला जाणार असून यातून डाळी, तेलबियांच्या खरेदीची थकबाकी शेतकऱ्यांना चुकती केली जाईल.

"नाफेड'कडून मूल्य समर्थन योजना (पीएसएस) आणि मूल्य स्थिरीकरण निधी (पीएसएफ) याअंतर्गत खरेदी केली जात आहे.

कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामातील खरेदीसाठी "नाफेड'ला 700 कोटी रुपयांचा निधी दिला असून, यातील 512 कोटी रुपये "नाफेड'ने महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाना या राज्यांसाठी वितरित केला आहे. महाराष्ट्रात "नाफेड'ने एक लाख टन तुरीची खरेदी केली असून आणखी 15 हजार टन खरेदी सुरू आहे. 845 टन मूग आणि 160 टन सोयाबीनची खरेदी केली जात आहे. अशाच प्रकारे मध्य प्रदेशात मूग आणि उडदाची खरेदी सुरू आहे. कृषी खात्याने "नाफेड'ला मध्य प्रदेशातून 11,250 टन उडीद आणि 55,500 टन मूग खरेदी करण्यास सांगितले आहे.

Web Title: new delhi news nafed and farmer