भाषण ही है मेरा शासन...

वृत्तसंस्था
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप बोलत असल्याची टीका अनेकदा केली जाते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याचा खरोखरीच शोध घेतला आणि मोदी हे महिन्याला सरासरी 19 भाषणे देत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या तुलनेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची दर महिन्याला भाषणाची सरासरी ही 11 च येत आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप बोलत असल्याची टीका अनेकदा केली जाते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याचा खरोखरीच शोध घेतला आणि मोदी हे महिन्याला सरासरी 19 भाषणे देत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या तुलनेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची दर महिन्याला भाषणाची सरासरी ही 11 च येत आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 41 महिन्यांत तब्बल 775 जाहीर भाषणे केली आहेत. प्रत्येक महिन्याला मोदींनी सरासरी 19 भाषणे दिल्याचे त्यातून सामोरे आले आहे. म्हणजेच दर तीन दिवसांपैकी दोन दिवस त्यांनी जाहीर सभांमधून भाषण केल्याचे म्हणता येईल. बहुतेक भाषणे ही किमान 30 मिनिटांची होती.
त्या उलट डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कालावधीत एक हजार 401 भाषणे दिली. म्हणजेच महिन्याला सरासरी 11 भाषणे दिली; पण अवघ्या तीन वर्षांत मोदींनी भाषणबाजीत डॉ. मनमोहनसिंग यांना मागे टाकले आहे. लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी लांबलचक भाषण केल्याचा विक्रमही मोदी यांच्या नावावर आहे.

अर्थात, मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक असल्याने त्यांची भाषणाची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आले. तसेच भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार मोदी हे "लीडर' आहेत. डॉ. मनमोहनसिंग हे फक्त "रीडर' होते. त्यामुळे मोदींच्या भाषणांची संख्या त्यांच्यापेक्षा जास्तच असणार, असाही युक्तिवाद करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी तीनशेहून अधिक सभा घेतल्याचेही सांगण्यात आले.

मोदींचा धडाका...
- 31 ः सप्टेंबर 2014 मध्ये एका महिन्यात मोदींची भाषणे
- 32 ः एप्रिल 2015 मध्ये मोदींच्या जाहीर सभा
- 264 ः 2015 मध्ये मोदींची जाहीर सभांमध्ये भाषणे
- 36 ः नोव्हेंबर 2015 या एकाच महिन्यात मोदींची भाषणे
- 166 ः परदेशांमधील भारतीयांसमोर मोदींची भाषणे

775
मोदी यांनी 41 महिन्यांतील जाहीर भाषणे

1,401
डॉ. मनमोहनसिंग यांची दहा वर्षांतील भाषणे

Web Title: new delhi news narendra modi speech and bjp government