'हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा; आम्ही सांभाळ करू'

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नवी दिल्लीः हिंदू नागरिकांनी चार मुलांना जन्म द्यावा, त्या मुलांचा सांभाळ करण्याचे काम आम्ही संन्यासी करू, असे वादग्रस्त वक्तव्य नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी केले आहे. ते स्वतःला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेतात. संबंधित व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

एका विशिष्ट समाजातील वाढत्या लोकसंख्येसाठी जबाबदार धरताना त्यांनी म्हटले आहे की, हिंदूंनी चार ते पाच मुले जन्माला घातली पाहिजेत. त्यांना मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर आमच्याकडे सोपवावीत. आम्ही त्या मुलांचा सांभाळ करु. हिंदूंना मी आव्हान करु इच्छितो की जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनप्रमाणे एखादा कठोर कायदा आणत नाही, तोपर्यंत हिंदूंना आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. प्रत्येक हिंदूने चार ते पाच मुलं जन्माला घातली पाहिजे. आपण एवढी मुलं सांभाळू शकत नाही असे म्हणणा-यांनी मुले जन्माला घालून आम्हा संन्याशांककडे सोपवावीत, आम्ही त्यांचा सांभाळ करु. आम्ही त्यासाठी गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचे शिक्षणही पुर्ण करु'.

एका समाजातील लोक आपली लोकसंख्या वाढविण्यासाठी मुलांना जन्म देत आहेत. आपली संख्या वाढवून देशावर ताबा मिळविण्याचा विचार करत आहेत. परंतु, असे व्हायला नको. संपुर्ण जग हिंदूकडून हिसकावण्यात आले आहे, आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे, असेही नरसिम्हा सरस्वती यांनी म्हटले आहे.

व्हिडिओत त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'मुस्लिम जिहादींकडून देशाला सर्वांत मोठा धोका आहे. जगाचा इतिहास आहे की, जेथे मुस्लिमांची संख्या तीन टक्क्याहून अधिक झाली तेथे त्यांनी अल्पसंख्यांकांना सोडलेले नाही.'

Web Title: new delhi news narsimha saraswati hindu should give birth four children