'पाकिस्तानी लष्कराकडून केला जातोय जिहादींचा वापर'

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

नवी दिल्लीः पाकिस्तानी लष्कराकडून अल्पसंख्यांकांना संपविण्यासाठी जिहादींचा वापर केला जात आहे, असा दावा पाकिस्तानमधील सामाजिक कार्यकर्ते नदीम नुसरत यांनी केला आहे.

वॉशिंग्टनमध्ये वास्तव्यास असलेले नुसरत म्हणाले, 'पाकिस्तानी लष्कर हे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याबरोबरच अल्पसंख्यांकांवर हल्ले करण्यासाठी जिहादींचा वापर करत आहे. भविष्यात भारताशी संबंध सुधारल्यास पाकिस्तान लष्कराला आपले अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल.'

'भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मैत्रिपुर्ण संबंध सुधारण्यामध्ये राजकीय अडथळा येत आहे. पाकिस्तानमध्ये लष्कराबरोबरच राजकीय नेते सुद्धा दहशतवादी संघटनांना पाठिंबा देतात. शिवाय, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना आपल्या जागेचा वापर करून देतात. यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने व इतर शांतता देशांनी पाकिस्तानला शासन करायला हवे,' असेही नसरत म्हणाले.

Web Title: new delhi news pak army using jihadis to kill minorities