आधार-पॅन जोडण्यासाठी एकपानी अर्ज

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

नवी दिल्ली: करदात्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एकपानी फॉर्म सादर केला आहे. यासंबंधी प्राप्तिकर विभागाने अधिसूचना सादर केली आहे.

नवी दिल्ली: करदात्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एकपानी फॉर्म सादर केला आहे. यासंबंधी प्राप्तिकर विभागाने अधिसूचना सादर केली आहे.

नागरिकांना या फॉर्मवर आपला पॅन आणि आधार क्रमांक, दोन्ही कार्डांवरील नावाचे स्पेलिंग नमूद करावे लागेल; तसेच हे आधार कार्ड इतर कोणत्याही पॅन कार्डासोबत लिंक केले जाणार नाही; तसेच त्यांच्याकडे केवळ एकच पॅन कार्ड आहे अशा स्वरूपाच्या घोषणापत्रावर सही करावी लागणार आहे. "पॅनला आधार जोडण्यासाठी फॉर्म हा कागदी स्वरूपातील आणखी एक पर्याय आहे. एसएमएस आणि ऑनलाइन जोडणीचा पर्याय खुला आहेच', असे प्राप्तिकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दोन्ही महत्त्वाचे दस्ताऐवज एकमेकांना जोडण्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. नागरिकांनी अखेरच्या दिवशी प्राप्तिकरच्या वेबसाइटवर गर्दी केली. त्यानंतर विभागाची वेबसाइट क्रॅश झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनेकांना येणारी अडचण लक्षात घेत ही मुदतवाढ देण्यात आली असून, जोडणी न करणाऱ्यांचे पॅन कार्ड आपोआप रद्द होणार नाही.

Web Title: new delhi news pan card and adhar card