प्रद्युम्न खून प्रकरण: पोलिस, शाळेविरोधात खटला भरणार

प्रद्युम्न खून प्रकरण: पोलिस, शाळेविरोधात खटला भरणार

रोहतक  : "रायन इंटरनॅशनल स्कूल'मधील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर खून प्रकरणामध्ये विनाकारण गोवल्याबद्दल हरियाना पोलिस आणि शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात अब्रू नुकसानीचा खटला भरण्याचा इशारा बस कंडक्‍टर अशोककुमार याने दिला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना अशोककुमारचे वकील मोहित वर्मा म्हणाले की, "" माझ्या आशिलास या प्रकरणामध्ये विनाकारण बळीचा बकरा करण्यात आले आहे.''

दरम्यान, प्रद्युम्न खून प्रकरणाचा तपास करणारा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणखी एका विद्यार्थ्यास अटक करू शकतो. प्रद्युम्नचा खून करण्यात त्याचाही हात असल्याचा संशय तपास संस्थेला आहे. त्या अनुषंगाने चौकशी प्रक्रियाही सुरू झाली आहे. प्रद्युम्नचा खून करणाऱ्या अकरावीतील विद्यार्थ्याने ज्या दुकानातून चाकू खरेदी केला होता, त्या दुकानामध्ये सीबीआयचे अधिकारी त्याला घेऊन गेले होते. या वेळी दुकानदाराने आरोपीला ओळखण्यास नकार दिला. रोज शेकडो लोक दुकानामध्ये खरेदीसाठी येतात, त्यामुळे प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवणे शक्‍य नसल्याचे त्याने सांगितले होते.

"क्‍लोजर रिपोर्ट'ची प्रतीक्षा
अशोककुमारचे वकील मोहित वर्मा म्हणाले की, "" आम्ही या प्रकरणामध्ये सीबीआय क्‍लोजर रिपोर्ट कधी सादर करते याची वाट पाहत आहोत. हा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही शाळेचे व्यवस्थापन आणि पोलिसांविरोधात खटला भरू. "सीबीआय'ने केलेल्या तपासात अशोककुमारने प्रद्युम्नचा खून करण्यामागे कोणतेही ठोस कारण आढळून येत नाही. या प्रकरणात पोलिस खाते तोंडघशी पडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com