'सर्जिकल स्ट्राइक' पुस्तक अन्‌ चित्रपटातही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

"उरी' सिनेमाकडे सर्वांचे लक्ष; गोखले लिखित पुस्तकाचे आज प्रकाशन

नवी दिल्ली : भारतीय लष्कराची सर्वाधिक आक्रमक कारवाई म्हणून ओळखल्या गेलेल्या "सर्जिकल स्ट्राइक' देशपरदेशात चर्चेचा विषय ठरला होता. भारतीय लष्कराने या वेळी दाखविलेल्या शौर्य आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. केंद्र सरकारनेही याचा बराच गाजावाजा केल्याने भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगासमोर आले होते. आता हाच "सर्जिकल स्ट्राइक'चा विषय चित्रपट आणि पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध होणार आहे.

मागील वर्षी 28 सप्टेंबर रोजी भारतीय कमांडो पॅराशूटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये उरतले होते, येथे त्यांनी 50 दहशतवाद्यांना ठार करत त्यांची ठाणी उद्‌ध्वस्त केली होती. शौर्य, देशभक्ती, थरार, उत्कंठा आणि धडाकेबाज कृती यांचा अनोखा मिलाफ "सर्जिकल स्ट्राइक'च्या निमित्ताने पाहायला मिळाला होता. काश्‍मीरमधील उरी सेक्‍टरमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने "सर्जिकल स्ट्राइक'चे नियोजन आखले होते. पुढील वर्षी याच विषयावर एक चित्रपटदेखील येऊ घातला असून, पूर्णपणे याच विषयावर आधारित असणारी दोन पुस्तकेही बाजारात आली आहेत. नितीन गोखले लिखित "इन सिक्‍योरिंग इंडिया दि मोदी वे : पठाणकोट, सर्जिकल स्ट्राइक्‍स अँड मोअर' या पुस्तकाचे उद्या (ता.29) रोजी दिल्लीमध्ये प्रकाशन होत आहे. शिव अरूर आणि राहुल सिंह यांनी लिहिलेले "इंडियाज मोस्ट फिअरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज' या पुस्तकामध्ये "सर्जिकल स्ट्राइक'चे वर्णन आहे.

रूपेरी पडद्यावर
रोनी स्क्रुवाला निर्मित आगामी "उरी' हा सिनेमा ही "सर्जिकल स्ट्राइक'चा थरार मांडणारा आहे. आदिया धर दिग्दर्शित या चित्रपटातील प्रमुख भूमिका ही कमांडर विकी कौशल याची आहे. "सर्जिकल स्ट्राइक' दरम्यान कौशल यांनीच भारतीय सैनिकांचे नेतृत्व करत दहशतवाद्यांच्या छावण्या उद्‌ध्वस्त केल्या होत्या. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये रिलीज झालेला गुरमीत राम रहीम सिंग यांचा "एमएसजी दि लॉयनहर्ट : हिंद का नापाक को जवाब' हा सिनेमाही "सर्जिकल स्ट्राइक'वरच बेतलेला असल्याचे बोलले जाते.

लादेननंतर स्ट्राइकचा विषय
कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेने राबविलेले ऑपरेशन जिरेनिमोवर अनेक चित्रपट आणि कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता भारतीय लष्कराचा सर्जिकल स्ट्राइकदेखील लेखक आणि दिग्दर्शकांना खुणावतो आहे. याबाबत बोलताना सामाजिक शास्त्रज्ञ शिव विश्‍वनाथन म्हणाले की, जय जवान, जय किसाननंतर आता आमच्याकडे "सर्जिकल स्ट्राइक' आहे.

Web Title: new delhi news surgical strike and book publication