परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जुलै 2017

नवी दिल्ली: "इराकमधील मोसूल शहरात 39 भारतीय तरुणांची हत्या झाली व ते जिवंत नाहीत हा दावा करणारा काँग्रेस आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरवून उलट-सुलट माहिती देणाऱ्या हरजीत मस्सी याची तळी उचलून धरत आहेत. हा यांचा राजकीय अजेंडा आहे,'' असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत आक्रमकपणे सांगितले. काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांनी, स्वराज यांनी हे तरुण सुखरूप असल्याचे वारंवार सांगून देशाची दिशाभूल केली, हा आरोप अधोरेखित करतानाच एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ इराकमध्ये पाठवा, अशी मागणी केली. सरकारकडून याबाबत मौन बाळगण्यात आले.

मोसूल शहरातून 40 भारतीयांचे अपहरण केले गेले होते. त्यातील मस्सी वगळता 39 जणांचा ठावठिकाणा लागेलला नाही. या मुद्यावर बाजवा यांनी आठ दिवसांपूर्वी शून्य प्रहरात सरकारवर गंभीर आरोप केले होते. स्वराज यांनी उत्तर देताना बेपत्ता तरुण सुरक्षितच आहेत, असा कोणताही ठाम दावा करण्याचे टाळले. त्या म्हणाल्या, "" गेल्या तीन वर्षांत सरकारने विविध देशांत अडकलेल्या 8 हजार भारतीयांना स्वतःच्या खिशातून तिकीट काढून सोडविले आहे. यात नेपाळमधून आलेले 1 लाख 5 हजार व सौदी अरेबियातून सोडविलेले 31 हजार लोक सामील नाहीत. विदेशात अडकलेल्या भारतीयांची मुक्तता फक्त एका ट्‌विटरच्या अंतरावर, अशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची ख्याती जगभरात झाली आहे.''

"मात्र, या भारतीयांना "इसिस' या इस्लामी दहशतवादी संघटनेने मारून टाकले याचा कोणताही ठोस पुरावा सरकारकडे नाही त्यामुळे ते मृत्युमुखी पडले असे सरकार कदापी जाहीर करणार नाही. त्यांचा शोध लावण्याचे प्रयत्नही सोडून देणार नाही,'' असे स्वराज यांनी ठामपणे सांगितले.

त्या म्हणाल्या, "ज्या तारखेला (15 जून) "इसिस'ने या सर्वांना गोळ्या घातल्या, असे मस्सी म्हणतो, त्याच्या दोन दिवसांनंतर त्यातील शिशानसिंग यांची आई व भाऊ त्याच्याशी बोलले आहेत. हे कसे शक्‍य आहे? सरकार हातावर हात धरून बसलेले नाही व मी संसदेची दिशाभूलही केलेली नाही. असा अपराध करण्यात माझा कोणता फायदा होणार आहे? ज्या दिवशी या तरुणांबाबत पुरावा मिळेल, त्या दिवशी मी स्वतः संसदेला त्याची माहिती देईन. या 39 तरुणांच्या जिवंत असण्याचा किंवा त्यांना इस्लामी दहशतवाद्यांनी मारून टाकल्याचा कोणताही पुरावा सरकारकडे नाही. लवकरच तो जगासमोर येईल. या तरुणांना मोसूल येथून बद्रूस येथे अतिरेक्‍यांनी हलविल्याचे वृत्त आहे.

Web Title: new delhi news sushma swarj and congress