गुजरातमध्ये निवडणूक काळात कडक बंदोबस्त

गुजरातमध्ये निवडणूक काळात कडक बंदोबस्त

नवी दिल्ली: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निमलष्करी दलांचे 32 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. यासह 60 हजार पोलिस कर्मचारीही निवडणूक बंदोबस्तासाठी गुजरातमध्ये तैनात असतील, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

गुजरामध्ये निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला केंद्रीय निमलष्करी दलांच्या 320 तुकड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात केंद्रीय राज्य राखीव दल (सीआरपीएफ) आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 32 हजार जवानांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार या तुकड्या राज्यात पोचतील आणि आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार संबंधित विभागांत त्या तैनात करण्यात येतील, अशी माहिती गृह मंत्रालयातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

केंद्रीय सशस्त्र पोलिसांची शंभर जवानांची तुकडीही गुजतरातमध्ये निवडणूक काळात पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय निमलष्करी दलांसोबत राज्यातील 60 हजार पोलिस कर्मचारी निवडणूक काळात बंदोबस्तासाठी तैनात असतील. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 व 14 डिसेंबरला मतदान होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com