योगी आदित्यनाथ व मौर्य यांचा खासदारकीचा राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी आज लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तर मौर्य फुलपूर (अलाहाबाद) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

उत्तर प्रदेशमध्ये सत्तापालटानंतर पक्षनेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली, तसेच केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपविण्यात आले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात दोन्ही नेत्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Web Title: new delhi news Yogi Adityanath and Mourya mp resign